loader
Breaking News
Breaking News
Foto

निरवडे झरबाजार येथे वाळलेली आकाशियाची झाडे वाहतुकीस धोकादायक

सावंतवाडी - सावंतवाडी शिरोडा महामार्गावर निरवडे झरबाजार नजीक जुन्या कौल फॅक्टरीसमोर रस्त्याच्या दुतर्फा वाळलेली आकाशियाची झाडे वाहतुकीस धोकादायक ठरत आहेत. पावसाळ्यात ही झाडे रस्त्यावर कोसळून अपघात होण्याची भिती वाहनचालकातुन व्यक्त होत आहे. सावंतवाडी तालुक्यात प्रशासनाकडून पावसाळ्याच्या तोंडावर खबरदारी म्हणून आवश्यक ती कामे हाती घेण्यात आली आहे. सावंतवाडी शिरोडा महामार्गावर बर्‍याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली झाडे वाळलेली आहेत. रेल्वे स्टेशन ते निरवडे आरोस तिठा या भागात आकाशियाची झाडे वाळलेली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेली दोन-चार वर्ष वाळून जीर्ण झालेली ही झाडे कधीही कोसळून रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हि झाडे एखाद्या वाहनावर पडल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते, अलीकडेच आंबोली या ठिकाणी एका चारचाकी वाहनावर झाडाची फांदी पडल्याने अपघात झाला होता. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशाच प्रकारे सावंतवाडी शिरोडा महामार्गावरील गिरड व वाळलेल्या झाडामुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टाईम्स स्पेशल

सार्वजनिक बांधकाम विभागाने याची खबरदारी घेत ही झाडे त्वरित हटवावीत व हा मार्ग पावसाळ्यामध्ये वाहतुकीसाठी सुरक्षित बनवावा, अशी मागणी स्थानिक नागरिक तसेच वाहन चालकांतून होत आहे. वारंवार या झाडांकडे लक्ष वेधूनही तसेच स्थानिकांकडून पाठपुरावा करूनही याबाबत कुठल्याच प्रकारची दखल संबंधित विभाग घेताना दिसून येत नाही. यावर्षी तरी पावसाळा सुरू होण्याआधी या झाडांसंबंधित योग्य कार्यवाही करवाी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg