loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली येथे चहा विक्री दुकानात अश्लिल खुणा केल्या प्रकरणी दोघा मजुरांविरोधात गुन्हा दाखल

बांदा (प्रतिनिधी) - इन्सुली येथे चहा व थंडपेय विक्रीच्या दुकानात काम करणार्‍या एका युवतीला अश्लील हातवारे व खुणा करून त्रास दिल्याप्रकरणी दोन मजुरांविरोधात बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इन्सुली परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर कार्यरत असलेले गंगाराम व दिलीप (पूर्ण नावे समजू शकली नाहीत) यांनी संबंधित युवतीकडे वारंवार अश्लील हातवारे तसेच खुणा करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार करण्यात आली. या प्रकारामुळे युवतीला मानसिक त्रास सहन करावा लागला. युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार बांदा पोलीस ठाण्यात संबंधित दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रसिका माळकर करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg