loader
Breaking News
Breaking News
Foto

कुडोशी गावात गाईवर अज्ञात वन्यप्राण्याचा हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण

खेड : तालुक्यातील कुडोशी गावात गाईवर अज्ञात वन्यप्राण्याने हल्ला करून ठार मारण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुडोशी येथील पेंढरीच्या वाटेवर गणपती मंदिराच्या वरच्या बाजूला ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश कदम यांच्या पांढऱ्या गाईवर अज्ञात वन्यप्राण्याने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना सकाळी सुमारे ६.१५ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. दरम्यान, वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन ग्रामस्थांना योग्य ती सुरक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg