loader
Breaking News
Breaking News
Foto

विजघर-घाटीवडे-मुळस-मेढे रस्ता अपूर्ण कामामुळे पहिल्याच पावसात बनला मृत्यूचा सापळा

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते विजघर हा चांगला डांबरीकरण केलेला रस्ता पंधरा वर्षे काही काम करायची गरज नसताना केवळ पर जिल्ह्यातील ठेकेदार कार्यकर्ते यांचे चोचले पुरवण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिटचा घाट घातला गेला. हा चांगला रस्ता बेजबाबदार ठेकेदार यांच्यामुळे धोकादायक बनला आहे. संबंधित ठेकेदार यांनी वेळेत काम पूर्ण केले नाही. यामुळे आज रविवारी पहाटे पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने विजघर घाटीवडे मुळस मेढे रस्ता धोकादायक बनला आहे. चिखल पाणी यामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. एकही बाजू पूर्ण केली नाही यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. बेजबाबदार ठेकेदारामुळे ही परस्थिती निर्माण झाली आहे. पहिल्या पावसात ही परिस्थिती तर पुढे चार महिन्यात काय होणार? अंदाज बांधणे अवघड झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा रस्ता खोदकाम करताना संबंधित ठेकेदार यांनी एका बाजूने काम करत तो रस्ता पूर्ण करून दोन्ही बाजूंनी सिमेंट काँक्रिट रस्ता पूर्ण करणे, मोर्‍या बांधकाम पूर्ण करणे अशी जबाबदारी होती. डिसेंबर महिन्यात रस्ता कामाला सुरुवात करून देखील एक दोन किलोमीटर रस्ता पूर्ण न करता ठिकठिकाणी तुकडे तुकडे करून ठेवले तर काही ठिकाणी चक्क जुना रस्ता तोडून त्या ठिकाणी तसाच सोडला. या रस्त्यावर एकावेळी दोन वाहने सुटतील अशी जागा ठेवली नाही. पाच महिने अगोदर कामाला सुरुवात करून देखील संबंधित ठेकेदार यांनी कामावर पावसाळा जवळ आला तरी भर दिला नाही. सदर बाब इंजिनिअर यांच्या निदर्शनास आणून दिली, तरी जलदगती म्हणून कामाकडे लक्ष दिले नाही. अनेक ठिकाणी धोकादायक परस्थिती निर्माण करून ठेवली आहे.

टाईम्स स्पेशल

रस्ता काम पाहाता पावसाळ्यात वाहन चालवता येणार नाही यामुळे या मार्गावर एस टी बसेस बंद करण्याचा विचार संबंधित आगाराकडून केला जात आहे. अपूर्ण रस्ता काम यामुळे प्रवासी जीव धोक्यात येऊ शकतो. ङ्ग रविवारी पहाटे मान्सूनपूर्व पावसाने जवळपास दोन तास झोडपून काढले. यामुळे मेढे, घाटीवडे, मुळस, विजघर, दरम्यान संपूर्ण माती चिखल निर्माण झाला. हे लक्षात घेऊन संबंधित ठेकेदार याने रस्ता एका बाजूने पूर्ण केला पाहिजे होता पण तस काही झाले नाही. तेव्हा पावसाळ्यात मोठया प्रमाणात अपघात या मार्गावर होणार आहेत ठेकेदार याच्या बेजबाबदार पणा बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg