खेड - तालुक्यातील तळे-जांभूळवाडी येथील ६८ वर्षीय विकलांग निवृत्त केंद्रीय कर्मचारी मारुती चंदू जाधव यांनी त्यांच्या मालकीच्या जागेतून अनधिकृतपणे पक्का रस्ता बांधण्यात आल्याचा गंभीर आरोप करत प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. या प्रकरणी त्यांनी पोलीस प्रशासन, तहसीलदार तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मौजे चिंचवाडी येथील भूमापन क्रमांक ३२/१८ या सामाईक जमिनीत कोणतीही परवानगी किंवा संमती न घेता संजय दाजी मोरे, विजय दाजी मोरे आणि मधुकर गंगाराम जाधव यांनी पक्का जांभ्याचा चार फुटांचा रस्ता बांधल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे. “भिकार माळावरील जागा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जागेत संबंधितांनी विकासाच्या नावाखाली काही गावकऱ्यांच्या सह्या घेऊन बळजबरीने रस्ता उभारल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे संबंधितांची स्वतःची जागा बाजूलाच उपलब्ध असतानाही आमच्या जागेतूनच रस्ता बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या रस्त्यासाठी शासनाचा निधी अनधिकृतपणे वापरण्यात आल्याचाही दावा अर्जदारांनी केला आहे. या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने जाधव कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सदर अनधिकृत रस्ता हटविण्यासाठी कामगार आणले असता संबंधितांनी त्यांच्या पुतण्या विलास जाधव व कामगारांना मारहाण करून रस्ता तोडण्यास विरोध केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत पोलीस स्टेशनमध्ये एनसी दाखल करण्यात आल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे.
“मी विकलांग असून निवृत्त केंद्रीय कर्मचारी आहे. आमच्यावर दादागिरी केली जात आहे. मला आणि माझ्या परिवाराला काही दगाफटका झाल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात यावे,” अशी मागणी मारुती जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे. या प्रकरणात ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग कोणती भूमिका घेणार याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.