loader
Breaking News
Breaking News
Foto

ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल तर चालू जनगणना त्वरीत थांबवावी - युयुत्सु आर्ते

देवरुख - खूप वर्षांनी भारतात जनगणना होत आहे. त्यातही गेल्या शतकात ओबीसींची स्वतंत्र जनगणना झालेली नाही. गेली अनेक वर्षे सातत्याने मागणी करुनही सध्या चालू असलेल्या जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल तर चालू असलेली जनगणना त्वरीत थांबविण्यात यावी अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सामाजिक न्यायासाठी, अचूक आकडेवारीसाठी, हक्काच्या आरक्षणासाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना होऊन ओबीसींना हक्क व न्याय मिळालाच पाहिजे. यासाठी वारंवार सर्व पातळीवर अर्ज, विनंत्या करुनही सरकारने ओबीसींची स्वतंत्र कॉलम शिवाय जनगणना सुरु केली आहे. लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी असून त्यांच्या संख्येप्रमाणे त्यांना आरक्षण व हक्क मिळणे आवश्यक असल्याने चालू करण्यात आलेली जनगणना ओबीसींचा स्वतंत्र कॉलम असला तरच करण्यात यावी. ओबीसींचा स्वतंत्र लोकसंख्येचा आकडा समजणार नसेल तर चालू जनगणना त्वरीत थांबविण्यात यावी. अन्यथा ओबीसींना संघर्षात उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

टाईम्स स्पेशल

लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व क्षेत्रात वाटा मिळणे आवश्यक आहे. विशिष्ट वर्गाला सर्व क्षेत्रात फायदे देवून ओबीसींना फायद्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे षडयंत्र लक्षात आले असून याविषयी ओबीसी संघटित होत असून स्वतंत्र जनगणना न झाल्यास व ओबीसींच्या रोषाला सामोरे जायचे नसेल तर ओबीसींची स्वतंत्र कॉलमनुसार जनगणना करावी, अन्यथा जनगणना त्वरीत थांबविण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनेकडून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg