loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसेचा दणका आणि मोठी गैरसोय टळली; फुटलेली पाइपलाइन अवघ्या दोन तासांत दुरुस्त

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जीवन शिक्षण शाळेजवळ भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू असताना जेसीबीमुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा अचानक बंद झाल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. विशेषतः मे महिन्याचा उकाडा, लग्नकार्यांचा हंगाम आणि गावातील विविध कार्यक्रम यामुळे परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता होती.घटनेची माहिती मिळताच मनसेचे तालुका सचिव प्रशांत साटले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित ठेकेदाराला निष्काळजीपणाबद्दल जाब विचारत त्यांनी नगरपंचायत प्रशासनालाही त्वरित काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मनसेचे प्रशांत साटले यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती मोहीम हाती घेतली. अवघ्या दोन तासांच्या प्रयत्नांनंतर फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करण्यात यश आले आणि बंद झालेला पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. वेळीच झालेल्या या कारवाईमुळे नागरिकांची होणारी मोठी गैरसोय टळली असून ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका सचिव प्रशांत साटले व नगरपंचायत प्रशासनाचे कौतुक केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg