loader
Breaking News
Breaking News
Foto

घाटीवडे गवसवाडी येथे अर्धवट मोरी कामामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण

दोडामार्ग (प्रतिनिधी) - विजघर-दोडामार्ग मुख्य राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून घाटीवडे येथील गवसवाडी परिसरात मुख्य रस्त्यावर मोरी टाकण्याचे काम गेल्या किमान एक महिन्यापासून अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ व शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. सदर ठिकाणी कामाची कोणतीही ठोस प्रगती दिसून येत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पावसाळा तोंडावर आलेला असताना मोरीचे काम अपूर्ण राहिल्यास पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात माती वाहून जाऊन खालच्या बाजूला असलेल्या घरांमध्ये तसेच शेती क्षेत्रात माती व गाळ घुसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला असून शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात जर मोठा पाऊस झाल्यास शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने तात्काळ मोरीच्या बांधकामाचे काम सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा होणार्‍या नुकसानास संबंधित यंत्रणा व ठेकेदार जबाबदार राहतील, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे. रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून घाटीवडे येथील गवसवाडी परिसरात मुख्य रस्त्यावर मोरी टाकण्याचे काम गेल्या किमान एक महिन्यापासून अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ व शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

सदर ठिकाणी कामाची कोणतीही ठोस प्रगती दिसून येत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पावसाळा तोंडावर आलेला असताना मोरीचे काम अपूर्ण राहिल्यास पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात माती वाहून जाऊन खालच्या बाजूला असलेल्या घरांमध्ये तसेच शेती मध्ये माती व गाळ घुसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला असून शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आठ दिवसात मोठा पाऊस सुरू झाल्यानंतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने तात्काळ मोरीच्या बांधकामाचे काम सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा होणार्‍या नुकसानास संबंधित यंत्रणा व ठेकेदार जबाबदार राहतील, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg