संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - खेड तालुक्यातील बहिरवली खाडीपट्टा भागातील रस्त्याची दुरुस्ती रखडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्य नफिसा हुसमत परकार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपविभागीय अभियंत्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सुसरी ते पन्हाळजे व कोरेगाव ते संगलट रस्त्याच्या दुरुस्तीबाबत यापूर्वीही पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.
बहिरवली खाडीपट्टा रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून वाहनचालक तसेच ग्रामस्थांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता पावसाळा तोंडावर आल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आधीच रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने पावसात याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे. गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.
मात्र याचे सोयरसुतक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना नसल्याचा आरोपही निवेदनात केला आहे. २५ मे पर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परकार यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनाही देण्यात आल्या आहेत.

































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.