दापोली (प्रतिनिधी) : वारा वादळाची आपत्तीजनक परिस्थिती उद्भवलेली नसताना देखील शनिवारी रात्री अचानकपणे खंडित झालेला विज पुरवठा रविवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत तरी खंडित वीजपुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यास विदयुत महावितरणला जमले नाही. त्यामुळे दापोलीकरांना शनिवारची रात्र अंधारात चाचपडतच काढावी लागली तर रविवारच्या ठरवलेल्या कामांचा पार बोजवारा उडाला. दापोली तालुक्यात शनिवारी २३ मे रोजी रात्री वारा सुटलेला नव्हता आणि वादळासारखी आपत्तीजनक परिस्थितीही निर्माण झालेली नव्हती. तरी सुद्धा शनिवारी रात्री दहा वाजता खंडीत झालेला विज पुरवठा रविवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरळीत करण्यास विदयुत महावितरणला यश आले नाही. त्यामुळे घरात पंखे बंद, कुलर बंद, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागल्या.
खंडीत विजपुरवठयामुळे झोपेचा खोळंबा, तर दिवसा कामकाज ठप्प अशी दुहेरी कोंडी निर्माण झाली. शनिवारी दापोलीत मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले होते. त्यांचा मुक्काम दापोलीतील केळशी ते दाभोळ दरम्यानच्या समुद्र किनार्यावरील विविध स्टे होम मध्ये होता. तसेच दापोली शहरातील त्याचप्रमाणे तालुक्यातील विविध भागातील हॉटेल रिसॉर्ट, एम.टी.डि.सी. मान्यता प्राप्त न्याहारी निवासांच्या ठिकाणी, घरगुती खानावळीत आदी सोयीच्या ठिकाणी त्यांनी आगावू ए.सी. रुम चे बुकिंग करून ठेवले होते. त्या ठिकाणी ते उतरले होते. मात्र विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या या प्रकारामुळे त्यांना ए.सी.ची सोय उपलब्ध करून देणे शक्य झाले नाही. त्यामुळे पर्यटन व्यवसायिकांना पर्यटकांच्या रोशाला सामोरे जावे लागले.
याचा फटका एकुणच पर्यटन व्यवसायाला बसला कारण सुरक्षित निवांतपणाच्या पर्यटनासाठी आलेल्यांना विदयुत पुरवठा नसल्याकारणाने त्यांनी आगावू बुकिंग केलेल्या बुकिंगनूसार त्यांना ए.सी. सोय उपलब्ध करून देता आली नाही यामुळे पर्यटकांची झोप खराब झाली आणि त्याचा थेट परिणाम हा वादावादीत झाला त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चांगलाच फटका बसला. तर दुसरीकडे विजेच्या खंडीत प्रकाराने सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या तसेच घरगुती आणि पर्यटन व्यवसायिकांनाही विजेच्या खंडीत प्रकाराने पंप लावून विहीरीतील त्याचप्रमाणे विंधन विहीरीतील पाणी उपसा करता आला नाही.अनेक ठिकाणी पाणी पुरवठा करण्यात अडचणी आल्या. रविवारी सुट्टीच्या दिवशी काही ठरवून ठेवलेल्या जसे दळण दळून आणने वगैरे कामांना तर फटका बसलाच शिवाय आईस्क्रीम, शितपेय, दुध, दुग्धजन्य पदार्थ, मोबाईल बॅटरी चार्ज करणे आदी विविध विजेवर अवलंबून असलेल्यांनाही फटका बसला.








































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.