loader
Breaking News
Breaking News
Foto

खेर्डीच्या अर्पितची भन्नाट कलाकारी; जडेजाही झाला थक्क, दिल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

खेड - चिपळूण तालुक्यातील खेर्डी गावातील अर्पित राकेश प्रजापती हा विद्यार्थी सध्या आपल्या अप्रतिम चित्रकलेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मेरी माता इंग्लिश मीडियम स्कूल, खेर्डी येथे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेला अर्पित लहानपणापासूनच चित्रकलेचा प्रचंड चाहता आहे. अभ्यास सांभाळत तो आपल्या मोकळ्या वेळेत सातत्याने ड्रॉईंग करत राहिला आणि त्याच्या या कलेला कुटुंबीयांकडूनही मोठा पाठिंबा मिळाला. तुला जे आवडतं ते मनापासून कर, पण अभ्यासाकडेही लक्ष दे, असा सल्ला देत घरच्यांनी अर्पितला नेहमी प्रोत्साहन दिले. त्याच प्रोत्साहनाच्या जोरावर आज अर्पित एक उत्कृष्ट कलाकार म्हणून पुढे येताना दिसत आहे. विशेष म्हणजे, घरामध्ये कोणीही चित्रकार किंवा कलाक्षेत्राशी संबंधित नसताना अर्पितमध्ये असलेली ही अद्भुत कला अनेकांना आश्चर्यचकित करत आहे. कोणताही कलावारसा नसताना त्याने स्वतःच्या जिद्दीने आणि मेहनतीने जोपासलेली ही कला पाहून अनेकजण याला दैवी देणगी मानत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याच्या हातात असलेले कौशल्य आणि चित्रांमधील बारकावे पाहता भविष्यात तो मोठा चित्रकार बनेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. गेल्या महिनाभरात अर्पितने भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा यांचे हुबेहूब चित्र रेखाटले. इतक्या बारकाईने आणि कौशल्याने त्याने हे चित्र साकारले की पाहणारेही थक्क झाले. हे चित्र स्वतः जडेजांना दाखवावे, अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी त्याचे वडील त्याला राजस्थान रॉयल्सचा सामना सुरू असताना स्टेडियममध्ये घेऊन गेले. स्टेडियममध्ये अर्पितने जडेजांना स्वतः काढलेले चित्र दाखवताच जडेजा देखील भारावून गेले. त्यांनी अर्पितचे भरभरून कौतुक करत, अशीच प्रगती करत रहा, चित्रकला कधी सोडू नकोस, तू खूप मोठा होशील, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

एवढेच नव्हे तर त्यांनी त्या चित्रावर स्वतःच्या हस्ताक्षरात तू खूप मोठा होणार असा खास संदेश लिहून स्वाक्षरीही केली. या घटनेनंतर खेर्डी गावात अर्पितच्या कलेची मोठी चर्चा सुरू झाली आहे. गावात इतका गुणी कलाकार आहे, याची अनेकांना कल्पनाही नव्हती. मात्र आता अर्पितच्या या यशामुळे संपूर्ण गावाला अभिमान वाटत असून भविष्यात हा मुलगा खेर्डी आणि चिपळूणचे नाव राज्यभर गाजवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अर्पितवर सध्या सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्याचे पुढील आयुष्य उज्ज्वल राहील, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg