loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रकल्पबाधित मच्छीमारांच्या विविध प्रश्नांबाबत तोडगा काढण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

‘न्हावा-शेवा–शिवडी सागरी सेतू प्रकल्पा’मुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या समस्यांबाबत शासन गंभीर असून मच्छीमारांचे हित अबाधित ठेवून त्यांच्या सर्व प्रश्नांवर न्याय्य तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध आहे. विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली. यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, स्थानिक मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) चे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg