loader
Breaking News
Breaking News
Foto

शिरोडा-केरवाडी समुद्रात बोट बुडाली; एक मच्छीमार बेपत्ता

वेंगुर्ला : आज पहाटे अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने शिरोडा - केरवाडी येथून समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली बोट बुडाली. यात केरवाडी येथीलच राजन सारंग (४६) हे बेपत्ता झाले आहेत. तर होडीचे मालक प्रकाश सारंग व त्यांचा मुलगा दाजी सारंग यांना वाचवण्यात दुसऱ्या होडीला यश आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिरोडा केरवाडी येथून नेहमीप्रमाणे एकाच कुटुंबातील प्रकाश सारंग, त्यांचा मुलगा दाजी व त्यांचा भाऊ राजन सारंग हे मच्छिमारीसाठी समुद्रात गेले होते. यावेळी पहाटे अचानक झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही मच्छिमारी बोट बुडाली. यात प्रकाश सारंग व त्यांचा मुलगा बोटीवर असणाऱ्या ऑइल टँकर मध्ये राहिले. यानंतर त्यांना वाचवण्यात दुसऱ्या बोटीला यश आले. मात्र राजन सारंग हे समुद्रात बुडाले. दरम्यान राजन सारंग यांचा समुद्रात शोध घेणे सुरू असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. केरवाडी येथील मच्छिमार सोसायटीचे चेअरमन काशिनाथ नार्वेकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg