loader
Breaking News
Breaking News
Foto

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी नितीन राऊळ यांची बांदा पोलिसांत तक्रार

बांदा (प्रतिनिधी) - इन्सुलीचे जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी सोशल मीडियावर बदनामीकारक व आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. २३ मे २०२६ रोजी एका सोशल मीडिया ग्रुपवर त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह संदेश प्रसारित करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाफोली येथे सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननाबाबत ग्रामस्थ विठ्ठल कळंगुटकर यांनी लोकप्रतिनिधी म्हणून नितीन राऊळ यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना माहिती दिली. प्रशासनाने तत्काळ कारवाई करत डंपर व जेसीबी ताब्यात घेतले. यानंतर सोशल मीडियावर इन्सुलीत होणारा वाळू उपसा दिसत नाही का? तसेच हप्ते घेतात का? अशा स्वरूपाचा संदेश व्हायरल करण्यात आला. हा संदेश आपली प्रतिमा मलिन करणारा असल्याचा आरोप नितीन राऊळ यांनी केला आहे.

टाईम्स स्पेशल

याबाबत त्यांनी बांदा पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांची भेट घेत संबंधित आरोपीचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी केली. सात दिवसांत आरोप सिद्ध न झाल्यास न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg