कर्जत (जयेश जाधव) - कर्जत तालुक्यातील खांडपे या गावात गेले एका वर्षापासून विद्युत वीजपुरवठा कमी दाबाने होत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना प्रचंड अडचणीला सामोरे जावे लागत आहे. याबाबतची लेखी तक्रार नागरिकांनी कर्जत येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये करून सुद्धा अधिकारी व कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. खांडपे ग्रामस्थांनी कर्जत येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात दिलेल्या तक्रार म्हटले आहे की कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे घरातील बल्ब, पंखे, फ्रिज आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालत नाही. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा कमी दाबामुळे पुरेसा प्रकाश नसतो ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असतो, परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते.
तसेच ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेच्या मोटारी सुद्धा कमी दाबाच्या वीज पुरवठ्याच्या समस्यामुळे पूर्ण क्षमतेने चालू शकत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होऊन गावात भीषण पाणीटंचाई निर्माण होत आहे. खांडपे गावात कमी दाबाने वीज पुरवठा बाबतची समस्या ही एक वर्षापासून सतावत आहे. याबाबत स्थानिक स्तरावर वारंवार लेखी-तोंडी तक्रारी करून अद्याप कोणतीच ठोस कारवाई आजपर्यंत झालेली नाही, असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. गावाचा वाढता विस्तार पाहता सध्याचे ट्रांसफार्मर (रोहित्र) अपुरे पडत आहे का? अन्य काही तांत्रिक बिघाड आहे का ? याची पातळीने तपासणी, आवश्यक त्या सुधारणा कराव्या, आवश्यक असल्यास नवीन क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसून नियमित योग्य दाबाने वीज पुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी शेवटी तक्रारीत नमूद केली आहे.
जर येत्या काही दिवसात वीज पुरवठा योग्य दाबाने सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा खांडपे ग्रामस्थांकडून कर्जत येथील वीज वितरण कार्यालयास देण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदनाची प्रत उप कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय कर्जत, कार्यकारी अभियंता पनवेल, अधीक्षक अभियंता पेण यांनाही पाठविण्यात आले आहे.

































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.