loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष आणि जि. प. सदस्य विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) - शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या वतीने विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आरोग्य शिबिरे, गरजू वस्तूंनी मदत आणि मनोरंजनाचे दर्जेदार कार्यक्रम आयोजित करून हा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला जाणार आहे. या वाढदिवस सोहळ्याची सुरुवात २७ मे रोजी रात्री ठीक १२ वाजता ओटवणे हायस्कूलच्या पटांगणावर केक कापून केली जाईल. त्यानंतर त्याच ठिकाणी रसिक प्रेक्षकांसाठी भव्य महिला दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाच्या मुख्य दिवशी, म्हणजेच २८ मे रोजी दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये सरमळे येथील रमाई नगर येथे चार हायस्पीड फॅनचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर माजगाव येथील विक्रांत सावंत यांच्या निवासस्थानी ’लॉरेन्स अँड मेयो’ यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरात परिसरातील २५ गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे. आरोग्य क्षेत्राला बळकटी देण्यासाठी या निमित्ताने विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयातील महिला सुतिकागृहासाठी इंडक्शन मशीन आणि सात लीटरचा थर्मास भेट म्हणून दिला जाणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे व जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यासोबतच, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी देखील उपयुक्त भेटवस्तू दिल्या जाणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे.

टाईम्स स्पेशल

वाढदिवसाच्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. वेत्ये येथील कलेश्वर पूर्वी देवी मंदिरात रात्री ८.३० वाजता ’राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक सिनेमा दाखविण्यात येणार आहे. तर सोनुर्ली येथे रात्री ठीक १० वाजता कुळघर रंगमंच येथे भव्य दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विक्रांत सावंत यांच्या मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे. विक्रांत विकासभाई सावंत यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघात आणि शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी च्या विद्यालयात विविध उपक्रमांच्या आयोजनातून वाढदिवस साजरा केला जातो आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg