loader
Breaking News
Breaking News
Foto

विजेच्या खांबाला कल्पवृक्षाचा आधार

संगलट (खेड)( प्रतिनिधी) - विजेच्या खांब्याचा ताणा हा चक्क कल्पवृक्षाच्या म्हणजेच नारळाच्या झाडाला बांधून ठेवण्यात आला आहे. या घटनेमुळे विजवितरण कंपनीच्या कारभाराला हसावे की रडावे असा प्रश्न लोकांना पडला आहे. मागील अनेक वर्षापासून दापोली खाडी पट्ट्यातील अनेक पोल नादुरुस्त झाले आहेत. गंजले आहेत.याबाबत वारंवार पाठपुरा करूनही वीज वितरण कंपनीकडून काहीही देखभाल दुरुस्ती होताना दिसत नाही.त्यामुळे या कारभारावर ग्रामस्थांची आधीच नाराजी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोलीतील फरारे मुख्य रस्त्यालगत एका घराजवळ असलेल्या विजेच्या खंlबाला चक्क येथील कर्मचाऱ्यांनी कल्पवृक्ष म्हणजे नारळाच्या झाडाला ताणा बांधून खंlबाला संरक्षण दिले आहे.तर दुसरीकडे चक्क अकरा केव्हीची विदयुत लाईन लोखंडी खंlबाच्या मध्यभागी बांधून प्रवाह सुरळीत केला आहे.पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच या लोखंडी खांबाला लाईन टच होऊन शॉक लागला तर मोठी हानी होऊ शकते.मात्र याचे गांभीर्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg