loader
Breaking News
Breaking News
Foto

आसुद काजरेवाडीतील निशांत धामणेला शिक्षणासाठी त्रिवेणी संगम ग्रुपचा मदतीचा हात

दापोली (प्रतिनिधी) - शैक्षणिक, क्रिडा, आरोग्य , मोफत उपचार व मार्गदर्शन शिबिरे , सांस्कृतिक आणि कृषिविषयक कामांसाठी तालुक्यात नावलौकिक असलेल्या आसुद येथील त्रिवेणी संगम ग्रुपने आसुद काजरेवाडीतील निशांत धामणे या विद्यार्थ्याला शैक्षणासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत देऊन त्रिवेणी संगम ग्रुप ने मदतीचा हात पुढे केला आहे या त्यांच्या शिक्षणाप्रती सामाजिक बांधिलकीच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील आसुद येथील काजरेवाडी येथे राहणाऱ्या निशांत धामणे या विदयार्थाला काही अपरिहार्य कारणामुळे शिक्षण घेणे कठीण होणार होते. ही बाब त्रिवेणी संगम ग्रुप चे अध्यक्ष अध्यक्ष नंदकुमार बांद्रे या समजदार आणि दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव असलेल्या संवेदनशील मनाच्या नेतृत्वाच्या लक्षात आली. अचानकपणे समोर ठाकलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एका उद्दात भावनेने त्यांनी निशांत धामणे या बालकाच्या शिक्षणासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत त्रिवेणी संगम ग्रुपने देऊन त्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. पहिली ते पाचवी पर्यंतच्या शिक्षणासाठी सर्व ती मदत देऊन त्याचे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या पाच वर्षांच्या यशस्वी कालावधीनंतर आता सहावी इयत्तेत दाखल झालेल्या निशांत धामणे या विदयार्थाला पुढील शैक्षणिक वर्षासाठी शक्य ती सर्व प्रकारची मदत त्यांच्या घरी जाऊन त्याच्याकडे सुपूर्द केली.

टाइम्स स्पेशल

त्रिवेणी संगम ग्रुप आसुदच्या या सामाजिक कामावेळी यावेळी त्रिवेणी संगम ग्रुपचे अध्यक्ष नंदकुमार बांद्रे ,आसूद ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ चव्हाण , मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुनील धामणे, जयवंत बांद्रे, दिलीप बांद्रे, संतोष बोथरे , रवींद्र रेवाळे, संदिप रेवाळे, कल्पेश माने, दिलीप मांडवकर, प्रभाकर शिगवण तसेच आसुद काजरेवाडीतील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg