संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील शिवणे गावात एका महिलेच्या बंद घराचे कुलूप फोडून परस्पर भाडेकरू ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप गावचे पोलिस पाटील मनोज शिंदे यांच्यावर करण्यात आला असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत स्मिता श्रीराम जुवेकर यांनी संगमेश्वर तहसीलदार कार्यालय तसेच संगमेश्वर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, शिवणे येथील ग्रामपंचायत हद्दीत असलेले त्यांचे राहते घर हे त्यांना वारसा हक्काने प्राप्त झाले असून, त्या घराचे इंदिरा आवास योजनेतून बांधकाम करण्यात आले आहे. सध्या त्या देवरुख येथे पती व मुलासह वास्तव्यास असून, शिवणे येथील घरी सुट्टी व इतर कामानिमित्त ये-जा करत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. तसेच त्या घराचे वीज बिल व घरपट्टी नियमित भरत असल्याचेही सांगितले आहे. मात्र, दि. २६ मे २०२६ रोजी गावचे पोलिस पाटील मनोज शिंदे यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता घराचे कुलूप फोडून तेथे एका दाम्पत्यास भाडेकरू म्हणून ठेवले, असा आरोप महिलेने केला आहे.
घरामध्ये कपडे, कागदपत्रे व इतर मौल्यवान वस्तू असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत विचारणा केली असता पोलिस पाटील यांनी दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जात असून, आम्हाला गावात येण्यास अडथळे निर्माण केले जात आहेत, असेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संबंधित महिलेने प्रशासनाकडे केली आहे.




































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.