रत्नागिरी (सागर गोवळे) : कोकणातील युवकांचे नोकरीसाठी होणारे स्थलांतर रोखून त्यांना त्यांच्या गावातच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे काळाची गरज आहे. या उद्देशाने जन शिक्षण संस्थान, रत्नागिरी आयोजित विशेष कौशल्य मेळावा नुकताच येथील मराठा भवन सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची विशेष उपस्थिती लाभली होती. या उपक्रमाची ३० वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवात झाली, ज्याचा लाभ आजवर ९० हजारांहून अधिक महिला आणि युवकांनी घेतला आहे. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सुरेश प्रभू म्हणाले, "कोकणचा युवा वर्ग नोकरीच्या शोधात मुंबईकडे वळतो, हे चित्र बदलायला हवे. गावोगावी स्वयंरोजगाराचे केंद्र निर्माण करून व्यक्तिकेंद्रित रोजगार विकास करणे हेच संस्थेचे ध्येय आहे. प्रशिक्षक, लाभार्थी आणि संस्था पदाधिकारी यांच्यातील मुक्त संवादच या कार्याला नवी दिशा देईल."
मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्ष उमा प्रभू यांनी महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला. त्या म्हणाल्या, "भारत सध्या जगातील सर्वाधिक तरुण देश आहे, परंतु येत्या २० वर्षांत ही स्थिती बदलेल. त्यामुळे वृद्धत्त्वाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आजच स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराची बळकट व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. महिला, मच्छिमार आणि शेतकरी बांधवांच्या गरजा ओळखूनच आम्ही कौशल्य आधारित अभ्यासक्रम निवडत आहोत." कार्यक्रमात बोर्ड मेंबर व युवा उद्योजक मिहीर महाजन यांनी भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "कोकणातील कृषी, पर्यटन आणि जहाज बांधणी उद्योगांना कुशल कारागिरांची मोठी गरज आहे. दापोलीपाठोपाठ आता रत्नागिरी जिल्ह्यातही हे कार्य विस्तारत आहे. यावर्षी विशेषतः पर्यटन आणि फ्रूट प्रोसेसिंग (फळ प्रक्रिया) क्षेत्रातील दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत."
या कार्यक्रमाला जन शिक्षण संस्थान रत्नागिरीच्या उपाध्यक्षा अदिती सावंत, बोर्ड मेंबर बबनराव पटवर्धन, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, राजू महाडीक यांच्यासह अनेक मान्यवर व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मिहीर महाजन यांच्या हस्ते सुरेश प्रभू यांचे स्वागत करण्यात आले.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.