loader
Breaking News
Breaking News
Foto

बुरंबी पंचक्रोशीत BSNL ची रेंजच गायब, Bsnl च्या ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशीत भारत संचार निगम अर्थात BSNL ला गेली अनेक दिवस रेंजच नसल्याने बीएसएनएल ग्राहकांमध्ये कमालीचा संताप पसरला आहे. मोबाईल असुन नसल्यासारखेच झाले आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी बीएसएनएल मोबाईल कंपनीच्या रेंजचा अभाव दिसत असुन यामुळे सेवा खंडित झाली आहे. परिणामी अनेकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. बुरंबी पंचक्रोशीत बुरंबी कुवेट येथील मनोर्याची रेंज परिसरातील गावांना मिळत होती. मात्र या मनोऱ्यात तांत्रिक बिघाड असल्याने पंचक्रोशीत रेंजच गायब झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येथील मनोऱ्यामध्ये झालेला बिघाड तात्काळ दुरुस्त करुन सेवा सुरळीत करावी अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडुन होत आहे. नुकत्याच देवरुख पंचायत समितीच्या मासिक सभेत बीएसएनएलच्या कारभारावर ताशेरे ओढुन सेवेत सुधारणा करण्याचा ठराव देखील करण्यात आला आहे. बीएसएनएलचे अनेक ग्राहक असल्याने अधिकारी वर्गाने तात्काळ या मागणीची दखल घेऊन सुधारणा करावी.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg