खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. तापाने फणफणलेल्या एका ४८ वर्षीय रुग्णाला पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय रत्नागिरी येथे नेले जात असताना, अचानक प्रकृती खालावल्यामुळे वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सचिन काशिराम कदम असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव असून ते कळंबणी गावडेवाडी येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कदम यांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र ताप येत असल्याने त्यांच्यावर स्थानिक पातळीवर उपचार सुरू होते. मात्र २१ जुलै रोजी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करून पुढील गंभीर उपचारासाठी त्यांना तात्काळ सिव्हिल रुग्णालय रत्नागिरी येथे हलवण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार सकाळी पावणेबाराच्या सुमारास १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना रत्नागिरीकडे घेऊन जाण्यात येत होते. मात्र, प्रवास सुरू असताना लवेल गावाजवळ पोहोचताच कदम यांची तब्येत कमालीची खालावली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नातेवाईकांनी आणि रुग्णवाहिका चालकाने त्यांना जवळच असलेल्या घरडा हॉस्पिटल लवेल येथे उपचारासाठी नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.