loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मल्लिकार्जुन खर्गे यांचा वाढदिवस श्रमदान, अन्नदान व शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा

पनवेल : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. श्रुती शाम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली श्रमदान, अन्नदान आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून हा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना उदंड, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल येथील काँग्रेस भवन परिसरात श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत डॉ. श्रुती शाम म्हात्रे, पनवेल महानगरपालिका काँग्रेसचे नगरसेवक हरीश केणी, लतिफ नालखंडे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी हातात झाडू घेऊन परिसर स्वच्छ करत स्वच्छतेचा संदेश दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर पनवेल येथील हिरवे गुरुजी शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या, पेन, पेन्सिल तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज असून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत काँग्रेस पक्ष सातत्याने सामाजिक कार्य करत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. तसेच नवीन पनवेल येथे जगन्नाथ पुरी रथोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नऊ दिवसांच्या उत्सवात हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित राहत आहेत. या उत्सवानिमित्त अन्नदानाच्या कार्यक्रमासाठी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजकांकडे देणगी सुपूर्द करण्यात आली. या सर्व उपक्रमांमुळे वाढदिवस हा केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संदेश देण्यात आला.

टाईम्स स्पेशल

यावेळी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. श्रुती शाम म्हात्रे, पनवेल मनपाचे काँग्रेस नगरसेवक हरीश केणी, लतिफ नालखंडे, कार्याध्यक्ष शशिकला सिंग, उपाध्यक्ष चेतन म्हात्रे, प्रवक्ते व सचिव अजय कापरे, लतिफ शेख, विजय केणी, बबन केणी, अमित दवे, विलास म्हात्रे, प्रदीप सुनके, डॉ. विजयकुमार चव्हाण, कुलदीप नेटके, साईराम हमाद, अभिजित मुंडक्कल, दीपक गुंजाल, एकनाथ ठोंबरे, राजीव माळी, रवि गायकवाड, अनुपमा चुड्डा, सोनिया सोटा, डॉ. स्वप्नील पवार, जसबिंदर सिंग, मुनावर देशमुख, फेमीना शेख, महेश केणी, महेश शिंदे, नजीर याहू तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg