पनवेल - येथील न्यू बॉम्बे कराटे क्लबची खेळाडू फॉस्टिना फर्नांडो हिने बांगलादेशातील ढाका येथे आयोजित १० व्या साऊथ एशियन कॅडेट, ज्युनिअर, अंडर-२१ आणि सीनियर कराटे अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत कॅडेट मुलींच्या +६१ किलो कुमिते गटात सुवर्णपदक पटकावून देशाचा, महाराष्ट्राचा आणि पनवेल शहराचा गौरव वाढविला आहे. या स्पर्धेत भारतासह बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, भूतान आणि मालदीव या दक्षिण आशियाई देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत फॉस्टिनाने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. फॉस्टिना ही अमेरिकन जपान कराटे असोसिएशन – इंटरनॅशनल (AJKA-I) संलग्न न्यू बॉम्बे कराटे क्लबची खेळाडू असून तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पनवेल कराटे-डो असोसिएशनतर्फे तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.
या आंतरराष्ट्रीय यशानंतर फॉस्टिना फर्नांडोची जॉर्डन येथे होणाऱ्या आगामी आशियाई कराटे अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली असून ती पुन्हा एकदा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या दुहेरी यशाबद्दल न्यू बॉम्बे कराटे क्लबचे अध्यक्ष रोहन यादव, संचालक बिपिन राय, अमेरिकन जपान कराटे असोसिएशन – इंटरनॅशनल (AJKA-I) चे नॅशनल रिप्रेझेंटेटिव्ह योगेश कांबळी, तसेच उमंग स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन अकादमीचे अध्यक्ष अभिषेक चव्हाण यांनी फॉस्टिनाचे मनःपूर्वक अभिनंदन करून जॉर्डन येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तिने तेथेही उत्कृष्ट कामगिरी करून भारतासाठी सुवर्ण यश संपादन करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याचबरोबर राज्यसभा खासदार संगीता यादव यांनीही फॉस्टिना फर्नांडो हिला आगामी आशियाई कराटे अजिंक्यपद स्पर्धेसाठी विशेष शुभेच्छा दिल्या. फॉस्टिना जॉर्डनमध्ये निश्चितच भारताचे नाव उज्ज्वल करेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच तिच्या उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठी शुभेच्छा देत भविष्यात आवश्यक त्या प्रत्येक स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. फॉस्टिनाच्या या ऐतिहासिक यशामुळे न्यू बॉम्बे कराटे क्लब, AJKA-I, पनवेल कराटे-डो असोसिएशन, पनवेल शहर, रायगड जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तिच्या या यशामुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.