loader
Breaking News
Breaking News
Foto

वणोशीत 'कृषी स्नेही' रावे गटातर्फे बीज अंकुरण चाचणीचे यशस्वी प्रात्यक्षिक संपन्न

​वणोशी तर्फ पंचनदी (सागर गोवळे): डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या 'कृषी स्नेही' (RAWE) विद्यार्थी गटातर्फे वणोशी येथे शेतकऱ्यांसाठी 'बीज अंकुरण चाचणी' या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणक्षमता तपासणे, दर्जेदार बियाण्यांची निवड करणे आणि अनावश्यक बियाण्यांचा अपव्यय टाळणे. ​महत्त्वाच्या पद्धती: कार्यक्रमात शेतकऱ्यांना खालील चार प्रमुख पद्धतींची सविस्तर माहिती देण्यात आली: पेट्री डिश पद्धत, गोणपाट पद्धत, वाळू पद्धत, जर्मिनेशन पेपर पद्धत कार्यक्रमादरम्यान भाताच्या १०० बियाण्यांचा वापर करून 'जर्मिनेशन पेपर पद्धतीचे' प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बियाणे योग्य अंतरावर ठेवून जर्मिनेशन पेपर कसा गुंडाळावा आणि आवश्यक ओलावा कसा राखावा, याचे प्रात्यक्षिक दाखवले. चार दिवसांनंतर उगवलेल्या बियांची संख्या मोजून अंकुरण टक्केवारी काढण्याचे खालील सूत्र शेतकऱ्यांना समजवून सांगण्यात आले. भात पिकासाठी किमान ८० ते ८५ टक्के अंकुरणक्षमता असलेले बियाणे वापरण्याचा मोलाचा सल्ला यावेळी देण्यात आला. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बीज अंकुरण चाचणी करता येणे शक्य झाले. योग्य बीजदर निश्चित करून पिकाची उगवण सुधारल्यामुळे उत्पादनवाढ साधण्यास मदत होणार आहे.

टाईम्स स्पेशल

हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषयतज्ज्ञ डॉ. महेंद्र पालशेतकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण व डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी कन्या श्रुती बोबडे, आकांक्षा गाडगे, समृद्धी जाधव, कोमल झिरवाळ, तन्वी नादिवडेकर, सलोनी सावंत, नीलम मदने, अंकिता मुंज, साक्षी लोके आणि श्रावणी मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. वणोशी परिसरातील शेतकरी वर्गाने या प्रात्यक्षिकाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg