loader
Breaking News
Breaking News
Foto

एका व्यासंगी आनंदी व निर्भीड व्यक्तिमत्वाला आपण मुकला, दयानंद मांगले यांच्याबद्दल अनेकांनी व्यक्त केली शोकभावना

देवगड(प्रतिनिधी) - एका व्यासंगी आनंदी व निर्भीड व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत. ‘दयानंद मांगले’ कायम सर्वांच्या मनात राहतील, अशी सदभावना अनेकांनी शोकसभेत व्यक्त केली. देवगड हनुमान मंडळाच्या वतीने सर्वपक्षीय नागरिकांची शोकसभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी शोक व्यक्त करताना माजी नगराध्यक्षा तन्वी चांदोस्कर, विलास रुमडे, प्रदिप सावंत, आण्णा खवळे, शिवराम निकम, राजेंद्र मुंबरकर, एकनाथ तेली काका ढोके यांनी दयानंद मांगले यांनी कॉलेज जीवनापासून आतापर्यंत विविध व्यासपीठावर काम केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाजयूमो माध्यमातून पक्षीय काम केले. त्याचप्रमाणे निर्भीड पत्रकारितेतून त्यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देताना पत्रकारितेमधील सहकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली. सर्वांना मदत करणारा सच्चा मार्गदर्शक म्हणूनही त्यांची नेहमी साथ राहिली. अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे आपल्या जैन समाजाचा झेंडा महाराष्ट्रभर उंचावताना अनेक व्यासपीठावर ते दिसले. त्यांच्या या व्यासंगी व्यक्तिमत्वाला वेळोवेळी त्यांचा सत्कार व पुरस्काराने सन्मान केला गेला. त्यांची उणीव कायम मनात राहील, अशी खंत व्यक्त केली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विलास साळसकर, सुरेश सोनटक्के यांचे शोक संदेशाचे वाचन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, संतोष तारी विशाल मांजरेकर बुवा तारी, उल्हास मणचेकर व नागरिक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg