loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड हायस्कूलमध्ये इंग्रजी कविता पाठांतर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

देवगड, (प्रतिनिधी) - शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथील इंग्रजी विभाग व इंग्लिश क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमधील इंग्रजी भाषेची आवड, उच्चार कौशल्य, आत्मविश्वास व सादरीकरण क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने इंग्रजी कविता पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा तीन गटांमध्ये पार पडली. गट क्रमांक १ (इयत्ता ५ वी ते ६ वी), गट क्रमांक २ (इयत्ता ७ वी ते ८ वी) आणि गट क्रमांक ३ (इयत्ता ९ वी ते १० वी) अशा तीन गटांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेचे परीक्षण शेठ म. ग. हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका अनुजा मुंबरकर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उच्चार, आवाजातील चढ-उतार, भावभावना, आत्मविश्वास व एकूण सादरीकरणाच्या आधारे स्पर्धकांचे मूल्यमापन केले. तसेच या स्पर्धेचे इंग्रजीतून सूत्रसंचालन इंग्लिश क्लबच्या विद्यार्थिनी अनन्या कुंभरे व श्रीमा प्रभूदेसाई यांनी केले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक प्रविण खडपकर, इंग्रजी विभाग प्रमुख संतोष चव्हाण, तसेच सहाय्यक शिक्षक सुरुंगले व आरती खोत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

टाईम्स स्पेशल

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वास चालना मिळत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी सादरीकरण करत स्पर्धेत रंगत आणली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन इंग्रजी विभाग व इंग्लिश क्लबच्या माध्यमातून करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg