loader
Breaking News
Breaking News
Foto

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खेड भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात

खेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त, भारतीय जनता पार्टी खेड, बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया, ओ.एच.एच. रेअर ब्लड ग्रुप असोसिएशन ट्रस्ट तासगांव, मदत ग्रुप खेड यांच्या संयुक्त विद्यमाने व भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ऍड.वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खेड शहरातील पोलीस स्टेशन समोरील पाथारजाई मंदिर सभागृहात पार पडलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाला खेड तालुक्यातील व शहरातील नागरिकांचा व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये रक्तदान करणार्‍या दात्यांना स्मार्ट वॉच व एयर बड्स फ्री देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या रक्तदान शिविराचे उद्घाटन प्रसंगी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा खेड नगर परिषदेचे नगरसेवक गटनेते रहीम भाई सहीबोले, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, खेड नगर परिषदेच्या नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, भाजपा खेड शहर उपाध्यक्ष शैलेश धारीया, भाजपा महिला मोर्चा खेड शहर अध्यक्षा आशा सनगरे, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्षा प्रीती चिखले, भाजपा युवा मोर्चा खेड तालुकाध्यक्ष विशाल होळकर, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, भाजपा खेड उपशहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, राहुल पाटणे, मंदार आपटे, प्रसाद गांधी, विनायक शिरगावकर, अनिकेत पवार, तुषार पवार, अक्षय सनगरे, राधेशाम वर्मा, प्रशांत गमरे, शाम तावडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg