loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्या गुहागर तालुका युवासेनेचा निषेध मोर्चा

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - दिल्लीमध्ये सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके हे शिक्षण व्यवस्थेच्या सुधारणेसाठी शांततेच्या मार्गाने उपोषण करत असताना, केंद्र सरकारने हुकूमशाही पद्धतीने त्यांना अटक केली. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी गुहागर तालुका युवासेनेने उद्या निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. उद्या गुरुवार, २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शृंगारतळी हायस्कूल येथे मार्चााचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

युवासेनेच्या सर्व पदाधिकारी, युवासैनिक यांनी वेळेत उपस्थित राहावे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या हक्कासाठी, तुमच्या भविष्यासाठी लढणार्‍या सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा. ही लढाई तुमची आहे, असे आवाहन करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील गुहागर तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनाही या निषेध मोर्चात सहभागी होण्याची विनंती आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg