रत्नागिरी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडळाच्या वतीने शुक्रवार दि २४ जुलै २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना अभिवादन करण्यात येणार आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा रत्नागिरी शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अजिंक्य केसरकर हे शिबिराचे संयोजक आहेत.
हे रक्तदान शिबिर सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय आठवडा बाजार रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य समाजहिताचे निर्णय आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यांना अभिवादन करण्यासाठी वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रक्तदानामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे हा उपक्रम समाजोपयोगी आणि प्रेरणादायी ठरणार आहे.
या शिबिरात भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन शहराध्यक्ष परशुराम (दादा) ढेकणे आणि संयोजक अजिंक्य केसरकर यांनी केले आहे. "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" हा संदेश समाजापर्यंत पोहोचवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.