loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी येथे गरजू रूग्ण व विद्यार्थ्यांना सामंत ट्रस्टतर्फे आर्थिक मदत

सावंतवाडी(प्रतिनिधी)- मुंबई येथील ‘सामंत ट्रस्ट’च्या वतीने सावंतवाडी येथील ‘डॉ. परुळेकर नर्सिंग होम’ येथे गरजू रुग्ण आणि विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते हे धनादेश देण्यात आले. या उपक्रमांतर्गत शैक्षणिक मदतीसाठी सावंतवाडी येथील विद्यार्थी पांडुरंग नमशी आणि मुंबई (सांताक्रूझ) येथील विद्यार्थिनी अल्पिता शेडगे यांना अर्थसहाय्य देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच वैद्यकीय उपचारांसाठी मसुरे येथील कर्करोगग्रस्त ओमप्रसाद शेडगे, ओटवणे येथील स्तनाच्या कर्करोगाने पीडित अक्षता जाधव, पेंडूर येथील भाग्यश्री राऊत (आतड्यातील रक्तस्त्राव व निमिया), वर्दे येथील वासुदेव सावंत (पित्ताशयाचा आजार), पेंडूर येथील संजय गावडे (अपस्मार व मतिमंदत्व), विद्या ढवळे (किडनीचा आजार) आणि नेमळे येथील रेश्मा झोरे (ग्रॅन्यूलोमा) या रुग्णांना ही आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg