सावंतवाडी(प्रतिनिधी)- शहरातील प्रसिद्ध आत्मेश्वर मंदिरावर आज बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एक जुने आणि भलेमोठे आंब्याचे झाड अचानक कोसळले. या दुर्घटनेत मंदिराच्या छपराचे नुकसान झाले असून, शेजारी उभी असलेली एक पिकअप व्हॅनही झाडाच्या बुंध्याखाली आल्याने तिचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात वादळी वार्यासह पाऊस सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. आज सकाळी आत्मेश्वर मंदिर परिसरातील हे जीर्ण झाड अचानक मंदिराच्या छपरावर कोसळले. त्याच वेळी रस्त्याच्या कडेला उभी असलेली स्थानिक नागरिक हळदणकर यांच्या मालकीची पिकअप व्हॅनही या झाडाखाली सापडल्याने चेपली गेली.
दरम्यान, शहरात आणि परिसरात अशी अनेक जीर्ण व धोकादायक झाडे आहेत. मान्सूनपूर्व काळातच नगरपालिका व प्रशासनाने अशा धोकादायक झाडांची पाहणी करून ती उतरवणे किंवा त्यांची छाटणी करणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भविष्यातील संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने अशा झाडांची पाहणी करून, योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.