loader
Breaking News
Breaking News
Foto

"छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार" प्राप्त झाल्याबद्दल ज्योति कदम यांचा शिवसेना खेडच्या वतीने भव्य नागरी सत्कार

खेड (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाचा मानाचा "छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार" प्राप्त झाल्याबद्दल ज्योति रामदासभाई कदम यांचा शिवसेना खेड तालुक्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. खेड तालुक्यातील विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धन व वृक्षलागवड क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. या सोहळ्यास शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध मान्यवर तसेच असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सत्कार समारंभ प्रसंगी शिवसेना उपनेते माजी आमदार संजयराव कदम, उत्तर जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख तथा जि. प. सदस्य सचिन धाडवे, खेड नगरीच्या नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, पंचायत समिती सभापती डॉ. आफिया पालेकर, उपनगराध्यक्ष सतिश चिकणे, महिला आघाडी जिल्हा उपसंघटक सुप्रिया पवार, शहर प्रमुख कुंदन सातपुते, शहर संघटिका नेहा दळी, जि. प. सदस्य रेवती पाटील, पं. स. सदस्य महेंद्र भोसले, युवासेनेचे मिलिंद काते, युवा सेना शहरप्रमुख मयुरेश दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. खेडच्या वतीने वृक्ष संवर्धनाच्या कार्याला दिलेली खरी दाद आहे. खेड मधील तब्बल 25 सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था यांनी ज्योती रामदासभाई कदम यांच्या कार्याचा गौरव केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg