वरवेली (गणेश किर्वे) - कोकणातील गुहागर तालुक्यात प्रतिभावंत कवी व लेखक आहेत याचा मला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन जेष्ठ अधिव्याख्याता रत्नागिरी डायटच्या दीपा मिलिंद सावंत यांनी केले. गुहागर तालुका सार्वजनिक ज्ञान रश्मी वाचनालय गुहागर व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागर यांच्या संयुक्त विद्यामाने राजेंद्र आरेकर यांच्या पाठ्यपुस्तकात कवितेचा समावेश, गुहागर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक सुधाकर कांबळे यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य उल्लेखनीय काम, मनोज पाटील यांची मराठी भाषा पाठ्यपुस्तक समितीवर निवड व प्राची कारेकर यांची ४३ चित्रे तिसरी व चौथीच्या पुस्तकात यांचा जाहीर नागरी सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, पाठ्यपुस्तकांमध्ये एखादी कविता एखादा धडा लागणे सोपी गोष्ट नाही. आज गुहागरमधील राजेंद्र आरेकर व डॉ. मनोज पाटील या दोघांना हा बहुमान मिळाला आहे.
आरेकरांची कविता इयत्ता सहावीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये आली आहे. तर मनोज पाटील सरांची मराठी भाषा पाठ्यपुस्तक मंडळावर निवड झाली आहे. या काही सामान्य गोष्टी नाहीत. यावेळी व्यासपीठावर गुहागरच्या नगराध्यक्ष नीता मालप व पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे उपस्थित होते. यावेळी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व पालक गौरव सोहळा करण्यात आला. यात ५ वी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी अनय मंदार कानडे, ज्ञानदा निलेशकुमार ढेरे, अन्वित विक्रांत दिगे. तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती मध्ये सोहम समीर बावधनकर, गार्गी अमोल शिरसागर, वरद केदार भागवत, वेदिका राजा हरिश्चंद्र जगदाळे या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी संत नामदेव शिंपी समाज गुहागर, अनिरुद्ध उपासना केंद्र गुहागर प्राथमिक शिक्षक संघ गुहागर शिवतेज फाउंडेशन, श्री व्याघ्रांबरी देवस्थान गुहागर यांच्या वतीने सत्कारमूर्तींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला ऍड संकेत साळवी,श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिक सुजाता कांबळे,प्रा. रश्मी अडेकर, चंद्रकांत झगडे, दत्तात्रय गुरव, ज्ञानेश्वर झगडे, विवेक जोशी, प्रभुनाथ देवळेकर, बाबासाहेब राशिनकर, ईश्वरचंद्र हलगरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्ञान रश्मी वाचनालयाच्या ग्रंथपाल गौरी घाडे आणि सानिका जांगळी व देवाळे यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनाली बावधनकर यांनी केले.










































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.