loader
Breaking News
Breaking News
Foto

माभळे पंचायत समिती मधील शाळेतील मुलांना भाजपा तर्फे वह्यांचे वाटप

संगमेश्वर - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून शाळेतील मुलांना वह्या वाटप करण्यात आले. मुलांनी खूप शिकावे, प्रगती करून स्वावलंबी व्हावे या हेतूने त्यांना छोटीशी भेट म्हणून वह्या वाटप करण्यात आले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वामध्ये सर्व शिक्षा अभियान सन २००१ मध्ये सुरु करण्यात आले. मुलांना या अभियानाचा मुख्य उद्देश समजून सांगितला गेला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

६ ते १४ वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण प्रदान करणे, ज्या भागात शाळा नाहीत आशा ठिकाणी नवीन शाळा उभारणे, दिव्यांग मुलांच्या शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित करणे असे अनेक उद्देश अभियानामध्ये घेण्यात आले होते. माभळे पंचायत समितीअंतर्गत येणार्‍या जि.प. शाळा आंबेड बुद्रुक नं. ४ दाभळवाडी, आंबेड बु. केंद्र शाळा क्र. १, जि. प. शाळा कुरधुंडा गुरववाडी, खापरे वाडी शाळा, केंद्र शाळा संगमेश्वर नं. २, तसेच जि. प. आदर्श शाळा लोवले क्र. १, पडयेवाडी, फटकरे वाडी आदी विविध शाळेतील मुलांना आणि संगमेश्वर तालुका बौद्धजन शिक्षण प्रसार संघ (उत्तर विभाग) येथील मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी महिला जिल्हा अध्यक्षा वर्षाताई ढेकणे आणि तालुका अध्यक्ष प्रतीक देसाई यांचे सहकार्य मिळाले. संपूर्ण दौर्‍याचे नियोजन महिला जिल्हा सरचिटणीस नुपुरा मुळ्ये आणि तालुका सरचिटणीस राजेश आंबेकर यांनी केले होते. सरिता आंबेकर, सुमन झगडे, रोहिणी सुर्वे, माधवी भिडे, वर्षा खंडकर, प्रमोद शेट्ये, विनय मुरकर, मंगेश साळवी, दिनेश आंब्रे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांनी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg