loader
Breaking News
Breaking News
Foto

लोवले येथे लाईनवर पडलेले झाड ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ हटविले; महावितरणच्या वायरमन किरण मोरे यांची तत्परता

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे लोवले येथील वरचेवठार परिसरातील रस्त्यावर एक मोठे झाड कोसळून ते वीजवाहिनीवर पडले. त्यामुळे वीजेचे खांब वाकले आणि परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे वायरमन किरण मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिराची वेळ आणि खांब वाकलेल्या अवस्थेत असतानाही त्यांनी आवश्यक खबरदारी घेत वीजवाहिनीची तपासणी केली. ग्रामस्थांच्या सहकार्याने पडलेले झाड हटविण्यात आले आणि सर्व लाईन तपासून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रात्री जवळपास १२ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कामात स्थानिक युवकांनीही मोठे योगदान दिले. केतन कदम, अनिकेत कदम, सोहम कदम, शशिकांत जाधव, मनीष मोरे, सागर कदम, सुभाष कदम, पंकज कदम, विजय पवार, रविकांत पवार आणि राजेश डोळस यांनी श्रमदान करून झाड हटविणे व मार्ग मोकळा करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. महावितरणचे वायरमन किरण मोरे आणि ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा धोका टळला. तसेच परिसरातील वीजपुरवठा अल्पावधीत पूर्ववत झाल्याने नागरिकांनी सर्वांचे कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg