loader
Breaking News
Breaking News
Foto

अधिकारी आणि जनतेमधील संवाद हा प्रशासनाचा कणा आहे, हसतमुखाने समजावून सांगाः पालकमंत्री नाम. सामंत

रत्नागिरी : शासकीय कामांसाठी सामान्य जनतेला कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, हाच ’शासन आपल्या दारी’ आणि ’महाराजस्व अभियानाचा’ मुख्य गाभा आहे. अधिकारी आणि जनतेमधील संवाद हा प्रशासनाचा कणा आहे. काम होणार असेल तर तात्काळ सांगा, नसेल होणार तरीही समोरच्याला ते हसतमुखाने समजावून सांगा, जेणेकरून जनतेचा रोष शमवता येईल, असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी केले. रत्नागिरी येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, सभापती प्रवीण पांचाळ, जिल्हा परिषद गटनेते महेश म्हाप, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, भाजपा तालुकाध्यक्ष दादा दळवी, सुशांत पाटकर, देवेंद्र वणजू, तहसीलदार राजाराम म्हात्रे यांसह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाषणाच्या सुरुवातीला पालकमंत्री सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले. अजितदादांच्या प्रशासनावरील पकडीचा आणि त्यांच्या वेगवान कार्यपद्धतीचा आदर्श समोर ठेवून काम केल्यास जिल्ह्यातील एकही काम प्रलंबित राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाने प्रकाशित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शिकेचा संदर्भ देत पालकमंत्री म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात लँडलाईनवर अवलंबून न राहता, जनतेशी थेट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ’नावीन्यपूर्ण योजने’तून जिल्ह्यातील ५०० अधिकार्‍यांना शासकीय मोबाईल क्रमांक दिले जातील. अधिकार्‍याची बदली झाली तरी हा क्रमांक त्याच पदावर राहील, ज्यामुळे जनतेला अधिकार्‍यांशी संपर्क साधणे सोपे होईल. रत्नागिरी जिल्हा सॅटेलाईट फोन वापरणारा पहिला जिल्हा असल्याचेही त्यांनी अभिमानाने नमूद केले.

टाईम्स स्पेशल

जिल्हा परिषदेवर निघणार्‍या एका कथित मोर्चाचा समाचार घेताना सामंत म्हणाले, ज्या आरोग्य केंद्रासाठी प्रशासनाने १५ दिवसांपूर्वीच २ कोटी ४६ लाख रुपये मंजूर केले आहेत, ते मंजूर व्हावे म्हणून काही लोक आंदोलनाचे नाटक करत आहेत. सोशल मीडियावर रील्स टाकून खोटा संभ्रम पसरवणार्‍यांना प्रसिद्धी देणे थांबवले पाहिजे. अशा खोट्या प्रचाराला प्रशासनाने तात्काळ खुलासा करून चोख उत्तर दिले पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपविभागीय अधिकारी (प्रांत) जीवन देसाई यांनी अभियानाच्या यशाची आकडेवारी मांडली. जिल्ह्यात २७,३६० डिजिटल सातबारा, ११,३२० आठ-अ चे उतारे आणि ४०,०७२ उत्पन्न दाखल्यांचे थेट वाटप करण्यात आले आहे. तसेच कृषी, कामगार, भूमी अभिलेख आणि आधार अपडेटचे स्टॉल्स एकाच छताखाली आणून जनतेच्या अडचणी जागेवरच सोडवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg