पनवेल - ‘नीट’ परीक्षेतील महाघोटाळ्यामुळे देशातील लाखो हुशार विद्यार्थ्यांचे स्वप्न आणि भविष्य आज अंधारात ढकलले गेले आहे. या ऐतिहासिक भ्रष्टाचाराची आणि निष्काळजीपणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री ‘धर्मेंद्र प्रधान’ यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे. यासोबतच, विद्यार्थ्यांचा आणि जनतेचा बुलंद आवाज बनून त्यांच्या हक्कासाठी लढणारे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय राहुल गांधी यांच्यावर झालेली अन्यायकारक पोलीस कारवाई ही हुकूमशाहीचा कळस आहे. या दडपशाहीचा आणि भ्रष्ट कारभाराचा तीव्र निषेध करण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल येथे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल शहर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांच्या नेतृत्वात ‘भव्य धरणे आंदोलन’ अत्यंत यशस्वीपणे पार पडले.
यावेळी रायगड जिल्हा कॉंग्रेसचे विधी सेलचे जिल्हाध्यक्ष ऍड. के. एस. पाटील, पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक हरीश केणी, नगरसेवक जनार्दन पाटील, नगरसेवक लतीफ शेख, नगरसेवक तुषार पाटील, नगरसेवक राम पाटील, नगरसेविका लीला कातकरी, महादेव कटेकर, माजी तालुकाध्यक्ष, पनवेल शहराध्यक्ष डॉ. अमित दवे, कामोठे शहर अध्यक्ष जयेश लोखंडे, ऍड. विक्रांत घरत, युवासेनेचे अवचित राऊत, ओबीसी जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नौफिल सय्यद, महिला जिल्हाध्यक्ष निर्मला म्हात्रे, इशिका सुधिजा, प्रेमा आप्पाचा, नीता शेनॉय, युवक कॉंग्रेसचे पनवेल विधानसभा अध्यक्ष विश्वजीत पाटील, प्रदेश सचिव प्रशांत पारवे, काशिफ इमाम, सोशल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष अभिजित पाटील, सुधीर मोरे, अम्मार मदार, रूपेश घरत, विलास दरे, कपिल यादव, शाहिद मुल्ला, वसीम पटेल, दीपक सुधीजा, जयश्री खटकले, दीपा ढोले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.