loader
Breaking News
Breaking News
Foto

माटणे काटा येथे मोटारसायकल स्कूटरमध्ये भिषण अपघात, मयेम गोवा येथील युवकाचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते आयी मार्गावर माटणे काटा येथे बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मोटार सायकल व स्कुटर दरम्यान झालेल्या भिषण अपघातात गोवा मयेम येथील एका युवकाचा जागीच मृत्यु झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांनी जखमींना मदत करत रुग्णवाहिकेमधून नेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुसाट मोटार सायकल एका युवकाच्या मृत्यला कारणीभूत ठरली. पोलीस आता तरी अशा वाहनधारकांवर कारवाई करणार काय? असे उपस्थितांतून बोलले जात होते. दोडामार्ग ते आयी मार्गावर हा भिषण अपघात झाला. झालेल्या अपघातात मयेम गोवा येथील दिपक कुंभार वय वर्षे २७ या तरूणाचे जागीच निधन झाले. तर गणू उसपकर, मये गोवा वय वर्षे २६, रामा सुरेश गवस, जयराम शिरोडकर हे तिघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय मध्ये दाखल केले.

टाईम्स स्पेशल

येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका कर्मचारी यांनी तातडीने उपचार करून पुढील उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले. मोटार सायकल एवढी सुसाट होती की, स्कुटरला जोरदार धडक देत रस्ता कडेला असलेला दगड उडवून वीस फूट फरफटत जाऊन रस्ता कडेला पडली. स्कुटरचा चेंदामेदा झाला. मयत याचे हात पाय मोडले, यावरून हा अपघात किती भयानक होता हे लक्षात येते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg