loader
Breaking News
Breaking News
Foto

मेढे-दोडामार्ग-वीजघर मार्गाची दयनीय अवस्था; पावसामुळे चिखलाचे साम्राज्य, नागरिक त्रस्त

दोडामार्ग, (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील मेढे ते दोडामार्ग वीजघर या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः घाटिवडे—गवसवाडी वळण येथे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मार्गावरून दररोज शेकडो नागरिकांची ये-जा होत असते. मात्र रस्त्यावर चिखल, खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. तसेच चारचाकी वाहनांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टाईम्स स्पेशल

स्थानिक नागरिकांनी संबंधित एमएसआयडीसी अधिकारी व ठेकेदारांकडून या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न केल्यामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे मेढे ते वीजघर मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg