सावंतवाडी - सावंतवाडी तालुका परीट समाजातर्फे सावंतवाडी तालुक्यातील दहावी बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करत असताना आपले ध्येय निश्चित करावे. त्या ध्येयाच्या वाटेवरून जाताना आपली भविष्यातील उन्नती साधावी. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घेऊन तसेच एमपीएससी यूपीएससी यासारख्या परीक्षा देऊन अधिकारी बनावे आणि आपल्या समाजाची मान वाढवावी व आपल्या उत्कर्षासाठी प्रयत्न करावे. आमची कौतुकाची थाप कायम तुमच्या पाठीशी राहील. तसेच यावेळी सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या हस्ते गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर फॉरेस्ट ऑफिसर श्रीकृष्ण परीट, महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश कुडाळकर, जिल्हा सेक्रेटरी अनिल शिवडावकर, जिल्हा सह सेक्रेटरी गुरुनाथ मडवळ, जिल्हा खजिनदार संदीप बांदेकर, महिला सदस्या सविता कुडाळकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष राजू भालेकर, महिला तालुकाध्यक्ष देवयानी मडवळ, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्रीकृष्ण परीट आपल्या भाषणात म्हणाले बदलत्या काळात केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन चालणार नाही तर विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच आपला पाया मजबूत करून व ध्येय निश्चित केले पाहिजे. या कार्यक्रम प्रसंगी महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, अनिल शिवडावकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी या मान्यवरांच्या हस्ते दहावी बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार सावंतवाडी तालुका परीट समाजाच्या वतीने करण्यात आला. यावेळी मनोहर रेडकर, लक्ष्मीदास आजगावकर, जितेंद्र मोरजकर, दयानंद रेडकर, प्रदीप भालेकर, भगवान वाडकर, विजय सांगेलकर, तुषार बांदेकर, सदाशिव कुडाळकर, संजय होडावडेकर, प्रवीण मोरजकर, योगेश आरोलकर, लक्ष्मण बांदेकर, सुरेंद्र कासकर, वरुण भालेकर, तीरोडकर, मडवळ, जय भालेकर व महिला भगिनी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय भालेकर तर प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजू भालेकर व आभार शहर अध्यक्ष दयानंद रेडकर यांनी केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.