loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत ३ ऑगस्टला ‘रानभाजी आस्वाद कार्यक्रम’ व प्रदर्शन; नगरपरिषदेचे महिलांना सहभागी होण्याचे आवाहन

​सावंतवाडी, (प्रतिनिधी) - पावसाळ्यात उगवणाऱ्या विविध रानभाज्यांचे औषधी गुणधर्म, पौष्टिकता आणि त्यांची ओळख नागरिकांना व्हावी, या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीतर्फे ‘रानभाजी आस्वाद कार्यक्रम’ (स्पर्धा) आयोजित करण्यात आली आहे. ​हा कार्यक्रम रविवार, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ३:३० वाजता बॅ. नाथ पै. सभागृहाबाहेरील मोकळ्या पॅसेजमध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमात रानभाज्यांपासून विविध खाद्यपदार्थ बनवून त्यांचे प्रदर्शन व स्टॉल उभारण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे ३१ जुलै पर्यंत सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयातील परवीन शेख (मो. ८५५०९५०७२१) यांच्याकडे नोंदवावीत. ​सावंतवाडी शहरातील सर्व महिलांनी या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर आणि उपसभापती सुनिता पेडणेकर यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg