loader
Breaking News
Breaking News
Foto

'सहजीवन' संस्था विश्वस्तपदी मोदी, ॲड. आनंद भोसले आणि संजय मोदी यांची निवड

खेड (प्रतिनिधी) - सहजीवन शिक्षण संस्थेच्या विश्वस्तपदी आयसीएस महाविद्यालय गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ॲड. आनंद भोसले व सहजीवन प्रायमरी स्कूलचे चेअरमन संजय मोदी यांची निवड करण्यात आली आहे. संस्थाध्यक्ष डॉ. उपेंद्र तलाठी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सहजीवन शिक्षण संस्थेच्या विश्वस्तपदाच्या रिक्त जागी दोघांची वर्णी लावण्यात आली. ॲड. भोसले गेल्या अनेक वर्षांपासून आय.सी.एस. महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन आहेत. नाविन्यपूर्ण उपक्रमांसह पारदर्शक कारभाराद्वारे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता अधिक विकसित करण्यासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सहजीवन प्रायमरी स्कूलच्या चेअरमनपदाच्या माध्यमातून संजय मोदी शैक्षणिक क्षेत्राला उभारी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. ते मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमनही आहेत. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रासह सहकार क्षेत्रात उठावदार कामगिरी केली आहे. या निवडीबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. उपेंद्र तलाठी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष मंगेश बुटाला, खजिनदार विलास बुटाला, अण्णासाहेब बेहेरे इन्स्टिट्यूटचे पंकज शहा, चंदुलाल शेट हायस्कूलचे प्रशाला समिती चेअरमन राजेश बुटाला, संचालक ना. बा. शेलार, संजय बुटाला, नंदलाल मुद्राळे, अभय तलाठी, मितेश बुटाला, संकेत बुटाला, सुरेश खेडेकर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg