loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू इंग्लिश स्कूल, लांजा येथे अत्याधुनिक आयटी लॅबचे दिमाखात उद्घाटन

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल अँड. तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आयटी लॅबचे उद्घाटन नुकतेच न्यू एज्युकेशन सोसायटी, लांजाचे चेअरमन जयवंत शेट्ये यांच्या हस्ते फीत कापून मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून, करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संस्थेचे अअध्यक्ष जयवंत शेट्ये सचिव महेश सप्रे, सहसचिव राजेश शेट्ये, संचालक प्रसन्न शेट्ये व सचिन भिंगार्डे, सल्लागार विजय बेर्डे व संतोष कोलते प्रशालेचे उपमुख्याध्यापक मंगेश वाघाटे, पर्यवेक्षक रविंद्र वासुरकर, आयटी शिक्षक प्रा. सचिन जोशी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान, डिजिटल कौशल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी ही आयटी लॅब महत्त्वपूर्ण ठरणार असून, भविष्यातील स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यास ती उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg