loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा येथे पार पडले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

लांजा (संजय साळवी) - छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर बुधवारी २२ जुलै रोजी शहरातील गणेश मंगल कार्यालय, लांजा येथे मोठ्या उत्साहात पार पडले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभर विधानसभा मतदारसंघनिहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने लांजा येथे हे शिबिर पार पडले. या शिबीराला प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी जमिनी संदर्भात असलेले विविध कायद्याबाबत शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केले. तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देताना लोकांनी या सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके यांनी मार्गदर्शन करताना महसूल विभागाने अशा प्रकारचे शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच या शासकीय योजनांचा सर्व शेतकरी लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके यांनी मार्गदर्शन करताना महसूल विभागाने अशा प्रकारचे शिबिर आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच या शासकीय योजनांचा सर्व शेतकरी लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. या शिबिरात शासनाच्या विविध विभागाचे स्टाॅल लावण्यात आले होते. उपस्थित ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी त्या स्टॉलवर जाऊन त्या-त्या शासकीय विभागातील योजनांची माहिती घेतली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिव्यांगाना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच नासा आणि इस्त्रोसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. त्याचबरोबर सक्षम बचत गटांनाही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके यांच्यासह लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, लांजा पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, राजापूर सभापती नंदिनी कदम, राजापूर तहसीलदार विकास गंबरे, लांजा - राजापूर - साखरपा विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील कुरूप, गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच राजापूर व लांजा तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg