loader
Breaking News
Breaking News
Foto

रामराजे महाविद्यालयात माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान व व्याख्यानाचे आयोजन

दापोली (प्रतिनिधी): रामराजे महाविद्यालय, दापोली आणि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दापोली शहरामध्ये विशेष 'स्वच्छता अभियान' राबवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांसाठी 'बँकिंग व सहकार क्षेत्रातील करिअरच्या संधी' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. दापोली शहरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानादरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व विद्यार्थ्यांनी परिसराची स्वच्छता करत नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सामाजिक उपक्रमाला शहरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छता अभियानानंतर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानासाठी प्रमुख वक्त्या म्हणून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (RDC Bank) दापोली उपव्यवस्थापक स्वप्नाली कालेकर उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना बँकिंग व सहकार क्षेत्रातील विविध संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि या क्षेत्रातील भविष्यातील आव्हाने व फायदे याबद्दल सविस्तर व मार्गदर्शनपर माहिती दिली.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक संदीप राजपुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वेदिका राणे, प्रा. कुणाल मंडलिक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष येसावरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. अंकिता दळवी, व प्रा.प्रीती सकपाळ व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता बैकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg