loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे नागरिकांना आवाहन “चला… प्रत्यक्ष शेतात उतरूया; नांगरणी आणि भातलावणीचा अनुभव घेऊया!”

रत्नागिरी, : ग्रामीण संस्कृतीची ओळख जपत आधुनिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने रविवार, दि. २६ जुलै रोजी SRI (System of Rice Intensification) आधुनिक भातशेती पद्धतीचे मॉडेल उभारणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात शहरातील नागरिक, युवक-युवती, महिला आणि लहान मुलांना आपल्या संपूर्ण कुटुंबासह प्रत्यक्ष शेतात उतरून नांगरणी आणि भातलावणीचा अनोखा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. अनेकांना केवळ पुस्तकांत किंवा चित्रपटांत पाहिलेला हा अनुभव प्रत्यक्षात घेता यावा आणि शेतीविषयी आत्मीयता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी सहभागी नागरिकांना SRI आधुनिक शेती पद्धतीची माहिती, तिचे फायदे आणि कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याची संकल्पना समजावून सांगितली जाणार आहे. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “मोबाईल आणि शहराच्या धकाधकीपासून काही क्षण दूर जाऊन आपल्या कुटुंबासह शेतात या. चिखलात उतरून नांगरणी व भातलावणीचा आनंद घ्या आणि आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टांचा प्रत्यक्ष अनुभव घ्या.” प्रवेश मर्यादित असून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी पूर्वनोंदणी करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी इच्छुकांनी ९६३७५८८५६५/९७६६५४३३३९/९५६१९९४८८१/९९७०४४३१३७ या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg