loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ४३ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, वैभववाडी आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात ४३ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. हे शिबिर वैभववाडी येथील भाजपा कार्यालयात उत्साहात पार पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, श्रद्धा रावराणे, प्राची तावडे, साची कोलते, शारदा कांबळे, संजय सावंत, देवानंद पालांडे, मंगेश लोके, हुसेन लांजेकर, बंड्या मांजरेकर, रितेश सुतार, प्रकाश पाटील, सुवर्णा संसारे, प्रदीप रावराणे, नेहा माईणकर, अतुल सरवटे, महेश संसारे, सुनील रावराणे, किशोर कांबळे, स्वप्नील खानविलकर, रणजीत तावडे, विवेक रावराणे, स्वप्निल धुरी, आशिष रावराणे, उदय पांचाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीचे अभिनंदन करत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच समाजहितासाठी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन करून त्यांचे आभारही व्यक्त केले. ओरस रक्तपेढीचे डॉ. उन्नती लडकत, सुमंगल बुगडे, सौरभ शिंदे, कांचन परब, सिद्धी जाधव, पवन हराळे, नितेश पाटील, सचिन बिले, प्रवीण नेरुळकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg