दापोली (सागर गोवळे) - ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी संगिनी समूहाच्या वतीने साखळोली नं. २ येथील शेतकऱ्यांसाठी 'एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन (IPDM)' या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात करताना कृषी संगिनी समूहाने शेतात प्रत्यक्ष उभे राहून पिकांवरील कीड व रोगांचे निरीक्षण कसे करावे, याबाबत प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक पी. डी. पोटफोडे यांनी शेतकऱ्यांना IPDM च्या विविध तंत्रांची सविस्तर माहिती दिली.
मार्गदर्शन करताना पोटफोडे व कृषी संगिनी समूहाने खालील मुद्द्यांवर विशेष भर दिला. कीटकनाशक फवारणीपूर्वी कीटकांची संख्या आर्थिक नुकसान पातळीवर पोहोचली आहे का, याची खात्री करणे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी विविध सापळ्यांचा वापर आणि जैविक नियंत्रणावर भर देणे. आवश्यक असेल तरच आणि मोजक्याच प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे. "पिकांची नियमित पाहणी करून सुरुवातीच्या अवस्थेतच कीड व रोगांची ओळख पटल्यास योग्य उपाययोजना करणे सोपे जाते.
रासायनिक कीटकनाशकांचा अनावश्यक वापर टाळून जैविक व एकात्मिक पद्धतींचा अवलंब केल्यास उत्पादन खर्च कमी होतो, पर्यावरणाचे संरक्षण होते आणि दर्जेदार, अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते," असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. प्रात्यक्षिकादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील अडीअडचणी व शंका मांडल्या, ज्यांचे मार्गदर्शकांनी योग्य निरसन केले. पर्यावरणपूरक शेती आणि शाश्वत उत्पादनवाढीसाठी IPDM तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा संकल्प यावेळी उपસ્થિત शेतकऱ्यांनी केला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.