loader
Breaking News
Breaking News
Foto

भाटघर येथे कृषीकन्यांकडून 'महाराष्ट्र गोमाता दिन' उत्साहात साजरा

दापोली (सागर गोवळे) - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या रावे (RAWE) कार्यक्रमातील 'कृषीकन्या' गटाच्या वतीने भाटघर येथे 'महाराष्ट्र गोमाता दिन' विविध आकर्षक उपक्रमांनी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गावातील प्रगतशील शेतकरी प्रथमेश खोपकर यांच्या गोठ्यात गोमाता पूजन करून करण्यात आली. यावेळी गोमातेला नैवेद्य अर्पण करून उपस्थितांनी आशीर्वाद घेतला. कृषीकन्यांनी गावातील शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांसाठी गोमाता या विषयावर रंगभरण स्पर्धा आयोजित केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना गोमातेची चित्रे, स्केचपेन संच व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात आल्या, तर उत्कृष्ट रंगभरण करणाऱ्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना विशेष बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कृषीकन्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या विद्यार्थ्यांनी 'महाराष्ट्र गोमाता दिन' या विषयावर प्रभावी भाषणे सादर केली. तसेच देशभक्तीपर गीते, भक्तिगीते व कविता सादर करून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी या जनजागृतीपर उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत कृषीकन्यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले.

टाईम्स स्पेशल

या संपूर्ण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशी गाईंचे महत्त्व, दुग्धव्यवसाय, शाश्वत शेती आणि ग्रामीण जीवनातील गोमातेचे अमूल्य योगदान याविषयी गांभीर्यपूर्वक जागरूकता निर्माण झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रावे कृषीकन्या गटाने विशेष परिश्रम घेतले. सदर प्रेरणादायी कार्यक्रम विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg